1. Home
 2. समुदायासाठीची मार्गदर्शक तत्त्वे

समुदायासाठीची मार्गदर्शक तत्त्वे

टिकटॉकमुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तुमच्या स्मार्टफोनमध्ये थेट कॅप्चर करून शेअर करता येतात. तुम्ही तुमच्या सर्जनशील कल्पना शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून व्यक्त करीत असताना, तुमचे मतभेद व्यक्त करीत असताना सामायिक आधार शोधून जागतिक टिकटॉक कम्युनिटीचा एक भाग बना.

आम्ही वेळोवेळी अद्ययावत करीत असलेली टिकटॉक कम्युनिटीची मार्गदर्शक तत्त्वे सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण वातावरणासाठी एक महत्त्वाची आचारसंहिता आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास तुमचे खाते आणि/किंवा मजकूर काढून टाकले/ला जाऊ शकते/तो. त्याव्यतिरिक्त, युजर्सने स्थानिक कायद्यांचे पालनही केले पाहिजे. लागू असलेल्या कायद्यानुसार प्राप्त परवानगीनुसार आम्ही तुमच्या मजकुरावर लक्ष ठेवून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती देण्याचा अधिकार आमच्याकडे राखून ठेवीत आहोत.

आमची [धोरणे](https://www.tiktok.com/hi/terms-of-use) आणि मार्गदर्शक तत्त्वे ही या कम्युनिटीतील प्रत्येकासाठी विश्वास, आदर आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पोषक ठरावीत अशी आहेत.

टिकटॉक ही खलील बाबी पोस्ट, शेअर किंवा प्रमोट करण्याची जागा नाही, ज्यात यांचा समावेश होतो:

हानिकारक किंवा धोकादायक मजकूर

तुम्ही जेव्हा टिकटॉकचा वापर करता तेव्हा तुम्ही एका जागतिक समुदायासोबत जोडले जाता. इतर युजर्सना इजा पोहोचेल किंवा त्यांना स्वत:ला इजा करून घेण्यास प्रोत्साहन मिळेल – मग ती शारीरिक, भावनिक, आर्थिक किंवा कायद्याच्या दृष्टीने असलेली इजा असो – असा मजकूर पोस्ट किंवा शेअर करू नका.

 • दहशतवादी संघटना आणि इतर गुन्हेगारी संघटनांना टिकटॉकचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. अशा संस्थांना किंवा व्यक्तींना चालना आणि पाठबळ देण्यासाठी टिकटॉकचा वापर करू नका.
 • ​ कोणतीही धोकादायक कृती, स्वत:ला करून घेतलेली इजा किंवा आत्महत्या शब्दबद्ध करणारा कोणताही मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका किंवा इतर लोकांना अशा कृती करण्यास प्रोत्साहित करील असा कोणताही मजकूर पुरवू नका.
 • ​खाण्यासंबंधीच्या विकृती शब्दबद्ध करणारा, त्याला चालना देणारा, प्रोत्साहन देणारा किंवा तशा सूचना देणारा कोणताही मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.
 • ​ज्यात विशिष्ट व्यक्तीला शारीरिक इजा करण्याच्या धमकीसह इतर लोकांना धमकी देऊ नका किंवा घाबरवू नका.
 • ​शस्त्रे, बाँम, अमली पदार्थ किंवा स्थानिक कायद्यानुसार नियमन केल्या गेलेल्या किंवा बंदी घातलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टिकटॉकचा वापर करू नका.
 • ऑनलाईन जुगार किंवा इतर आर्थिक योजनांना प्रोत्साहन किंवा चालना देण्यासाठी टिकटॉकचा वापर करू नका.
 • बेकायदेशीर कृतींचा समावेश असलेला कोणताही मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.

लैंगिक वर्णनात्मक किंवा धक्कादायक मजकूर

​टिकटॉक ही लैंगिक वर्णनात्मक, हिंसक, धक्कादायक किंवा संवेदनशील मजकूरासाठीची जागा नाही. तुम्ही जो मजकूर तुमच्या आईवडिलांना किंवा मुलांना दाखवू शकत नसाल, तर असा मजकूर कृपया येथे पोस्ट करू नका.

 • कोणताही हिंसक, लैंगिक वर्णनात्मक किंवा संवेदनशील मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका, किंवा इतरांना हिंसक कृती करण्यास प्रवृत्त करील असा कोणताही मजकूर पुरवू नका.

भेदभाव किंवा द्वेष निर्माण करणारे भाषण

टिकटॉक हा एक सर्वसमावेशक समुदाय आहे. इतर युजर्सवर हल्ला करणे किंवा हिंसाचार घडवून आणणे हे कधीही स्वीकारार्ह नसेल.

 • लोकांची जात, वंश, धर्म, राष्ट्रीयता, संस्कृती, अपंगत्व, लैंगिक ओढ, लिंग, लैंगिक ओळख, वय किंवा इतर प्रकारचा भेदभाव यांवर आधारित लोकांमध्ये द्वेष वाढीस लागेल असा कोणताही मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.
 • ट्रोलिंग किंवा चिथावणी देणाऱ्या शेऱ्यांसह असंतोष पसरले असा कोणताही मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.

नग्नता किंवा लैंगिक कृती

आपला समुदाय लैंगिक मजकूर किंवा लैंगिक तृप्ती करण्याच्या उद्देशाने असलेला मजकूर पाठवण्यासाठीची जागा नाही. तुम्ही जी बाब सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करण्यासाठी योग्य समजत नाही, ती पोस्ट करू नका.

 • ​ज्यात लैंगिक अत्याचार, लैंगिक दुरुपयोग, लैंगिक शोषण किंवा लैंगिक हिंसा अशा बाबी असतील, त्यांना चालना दिलेली असेल किंवा प्रोत्साहन दिलेले असेल अशा मजकुरारला टिकटॉक सक्त मनाई करते. अशा प्रकारचा कोणताही मजकूर पोस्ट करू नका.
 • क्षोभक मजकूर, लैंगिक मजकूर किंवा नग्नता अशा बाबी पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.
 • व्येश्याव्यवसाय, प्रेमयाचना किंवा इतर प्रकारच्या लैंगिक व्यवसायाशी संबंधित मजकूर पुरवू नका.

मुलांच्या सुरक्षिततेविषयीचे उल्लंघन

टिकटॉक मुलांच्या सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व देते. जर आम्हाला मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या, त्यांना लक्ष्य बनवणाऱ्या किंवा धोक्यात टाकणाऱ्या मजकुराची जाणीव झाली, तर आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याबद्दल सतर्क करू किंवा योग्य असेल त्याप्रमाणे केस दाखल करू.

 • अल्पवयीन व्यक्तींचा समावेश असलेल्या किंवा अल्पवयीन व्यक्तींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मजकुराला टिकटॉक सक्त मनाई करते. अशा प्रकारचा कोणताही मजकूर पोस्ट करू नका.
 • नग्नता, लैंगिकता सूचक कृती किंवा नकळतपणे चिथावणी देणारा अल्पवयीन व्यक्तींचा समावेश असलेले व्हिडिओ टिकटॉक काढून टाकू शकते किंवा त्याच्या ॲक्सेसवर मर्यादा घालू शकते, कारण अशा व्हिडिओज्‌चा वापर इतर अनपेक्षित मार्गांनी करू शकतात.
 • अल्पवयीन व्यक्तींच्यासोबत ऑनलाईन डेटिंग, पैसे देऊन केलेले डेटिंग, त्यांच्या खाजगीपणावर आक्रमण करणारा मजकूर किंवा ज्यामुळे अल्पवयीन व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका उत्पन्न होईल असा इतर मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.
 • अल्पवयीन युजर्सचा छळ करण्यासाठी पब्लिक पोस्ट्‌स किंवा प्रायव्हेट मेसेजेस यांचा वापर करू नका.
 • तुम्ही जर १३ वर्षाखालील वयाचे असलात किंवा तुमच्या देशातील किंवा प्रदेशातील सेवेच्या बाबतीत स्वतंत्रपणे निश्चित केलेल्या किमान वयाचे नसलात. तर हे ॲप वापरू नका

​छळ किंवा सायबरच्या माध्यमातून फसवणूक

सकारात्मक वातावरणास आमच्या युजर्सना गैरवापरमुक्त अनुभवास चालना देण्यासाठी आम्ही मेहनत करीत असतो. तुमच्या परस्परक्रिया सुसंस्कृत असू द्या आणि सर्व युजर्सशी सन्मानाने वागा.

 • इतर लोकांचा छळ करण्यासाठी सार्वजनिक पोस्ट आणि/किंवा प्रायव्हेट मेसेजेसचा वापर करू नका.
 • इतरांची वैयक्तिक ओळख पटेल अशी पत्ता, फोन नंबर, ईमेल पत्ता, आयडी क्रमांक आणि क्रेडिट कार्ड नंबर यांसारखी माहिती उघड करू नका.
 • इतर लोकांना जाणूनबुजून कमी लेखू नका, त्यांची बेअदबी करू नका किंवा फसवू नका किंवा इतर युजर्सना तसे करण्यास प्रोत्साहन देऊ नका.

तोतयेगिरी, स्पॅक किंवा दिशाभूल करणारा इतर मजकूर

आमची कम्युनिटी उच्च दर्जाच्या, आशयघन मजकुराची कदर करते. स्पॅम, खोटा किंवा दिशाभूल करणारा मजकूर किंवा वर्तन काढून टाकले जाईल.

 • बनावट ओळखी निर्माण करून इतर व्यक्ती किंवा संघटना असल्याची तोतयेगिरी करू नका, इतर व्यक्तींबरोबरचे किंवा संस्थांबरोबरचे वर्तन असे आहे असे विश्वास ठेवण्याबद्दल त्यांना गोंधळवू नका, जसे तुम्ही प्रत्यक्षात नाही किंवा पैसे कमावण्यासाठी दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट करू नका.
 • कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम ट्रॅफिक निर्माण करू नका, जसे ट्रेडिंग कॉमेंट्‌स, कॉमेंट्‌स लिहिण्यासाठी इतरांना कामाला लावणे किंवा इतरांसाठी काम करणे, तोच तोच मजकूर पुन:पुन्हा शेअर करणे, चेन लेटर्स पाठवणे आणि व्ह्यूज, लाईक्स आणि कॉमेंट्‌सना प्रोत्साहन देण्यासाठी फसव्या माहितीचा उपयोग करणे.

बौद्धिक संपदा आणि कामाच्या ठिकाणचा मजकूर

टिकटॉक ही जागा सर्जनशीलतेसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि अस्सल अभिव्यक्तीसाठी आहे.

 • इतर कुणाचेही मुद्रणहक्क, नाममुद्रा किंवा बौद्धिकसंपदा हक्क यांचे उल्लंघन करील असा मजकूर पोस्ट करू नका, शेअर करू नका किंवा पाठवू नका.
 • तुमच्या नियोक्त्याच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन होईल असा मजकूर किंवा माहिती पोस्ट करू नका.

इतर द्वेषपूर्ण कृती

वर उल्लेख केलेल्या मजकुराच्या आणि वर्तनाच्या व्यतिरिक्त, ज्या कृतींमुळे टिकटॉकला कमीपणा येईल अशा कृतींना आमच्या धोरणांमध्ये प्रतिबंध केलेला आहे.

 • टिकटॉकच्या दैनंदिन कृतींमध्ये हस्तक्षेप करू नका, त्यांचे संकेतस्थळ किंवा संबंधित नेटवर्क हॅक करू नका किंवा युजर्स ॲक्सेसवर बंधने घालण्यासाठीच्या उपाययोजनांना टाळून पुढे जाऊ नका.
 • ज्या फाईल्समध्ये व्हायरसेस, ट्रोजन्स, वर्म्स, लॉजिक बाँबस्‌ किंवा दुष्प्रवृत्तीयुक्त किंवा तांत्रिकदृष्ट्या इजा पोहोचविणाऱ्या फाईल्स वितरित करू नका.
 • टिकटॉकवर आधारित असलेल्या कोणत्याही डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्‌सला मॉडिफाय, ॲडॅप्ट ट्रान्सलेट, रिव्हर्स इंजिनिअर, डिसअसेंबल, डिकंपाईल किंवा क्रिएट करू नका, ज्यात कोणत्याही फाईल्स, टेबल्स किंवा डॉक्युमेंटेशनचा समावेश असेल किंवा कोणताही सोर्स कोड, अल्गोरिदम्स, पद्धती किंवा तंत्रे रिजनरेट करण्याचा प्रयत्न करू नका.
 • टिकटॉककडून माहिती गोळा करण्यासाठी स्वयंचलित स्क्रिप्टचा वापर करू नका.

एक जबाबदार कम्युनिटी मेंबर असल्याबद्दल आणि सर्व युजर्ससाठी सुरक्षित आणि आनंद लुटण्यायोग्य जागा राखण्यासाठी तुम्हाला जमेल तेवढे योगदान दिल्याबद्दल धन्यवाद. कोणत्याही कम्युनिटी गाईडलाईन्सचा भंग होतोय असा मजकूर तुम्ही पाहिल्यास कृपया त्याविषयी माहिती द्या, ज्यामुळे आम्ही पुनरावलोकन करून योग्य ती कृती करू. तुम्हाल अजून काही प्रश्न असल्यास कृपया privacy@tiktok.com शी संपर्क साधा.

Updated on April 16, 2019

Was this article helpful?